WhatsApp

Post Office RD Scheme: रोज फक्त 100 रुपयांची बचत करा आणि कमवा 5 लाख रुपये, जाणून घ्या गुंतवणुकीचा प्लान

Post Office RD Scheme: असे बरेच लोकं आहे जे आपलं पुढील भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करण्याचा प्लॅन करतात. परंतु योग्य माहिती नसल्यामुळे लोकं गुंतवणूक करण्यासाठी खूप घाबरतात. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण पोस्ट ऑफिस मध्ये एक अशी स्कीम राबवली जात आहे. ज्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवणूक करता.

तर तुम्हाला मॅच्युरिटीवर खूप मोठा रिटर्न मिळतो आणि हो तुम्हाला या योजनेमध्ये दर महिन्याला पैसे जमा करावे लागतात. जमा केलेल्या पैशावर तुम्हाला आकर्षित व्याज सुद्धा दिलं जाते व त्याचबरोबर चक्रवृद्धी व्याजाचा लाभ पण मिळतो. तर चला बघूया 100 रुपये जमा करून तुम्ही 5 लाख रुपयांचे रिटर्न कसे मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम काय आहे?

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे आणि या स्कीमचं अकाउंट तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये खोलायचं असते. जे व्यक्ती थोडी थोडी बचत करून खूप मोठा रिटर्न मिळवण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांच्यासाठी ही स्कीम योग्य आहे. गुंतवणूकदारांना पाच वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात.

जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अजून पाच वर्षासाठी पैसे ठेवू शकतात. थोडक्यात सांगायची तर तुम्ही दहा वर्षापर्यंत सुद्धा पैसे जमा करू शकतात. दीर्घकाळ निवेश करण्याचा फायदा हाच आहे की तुम्हाला जास्त मोबदला मिळतो. याशिवाय तुम्हाला बरेच काही फायदे मिळतात आणि तुमचे पैसे सुद्धा सुरक्षित राहतात.

पोस्ट ऑफिस आरडी चे फायदे काय आहे?

जर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतात आणि त्या पैशांना कोणत्या प्रकारचा खतरा राहत नाही. कारण ही योजना केंद्र सरकारच्या‌ अंतर्गत राबविली जात आहे. याव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती फक्त 100 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकतात.

या स्कीमची विशेषता हीच आहे की तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी मध्ये किती पण पैसे गुंतवू शकता. तुम्हाला जमा पैशावर 6.7 टक्के दरवर्षी व्याज दिले जाते आणि हे व्याज दर तीन महिन्याला चक्रवृद्धी पद्धतीने मिळते. गुंतवणूकदार आरडी स्कीम मध्ये 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात.

कोण उघडू शकते आरडी स्कीमच खाते?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की पोस्ट ऑफिस आरडी स्कीमचं खातं कोण कोण ओपन करू शकते. तर बघा या स्कीमचं खातं कोणताही प्रौढ व्यक्ती ओपन करू शकते. याच बरोबर तीन व्यक्तींना मिळून जॉईंट खाते खोलण्याची सुविधा मिळते.

जर कोणता व्यक्ती अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम आहे तर अशा परिस्थितीत त्यांचं खातं पालकाच्या माध्यमातूनच ओपन केल्या जाऊ शकते. या व्यतिरिक्त 10 वर्ष वय असलेल्या मुलाचे खाते उघडल्या जाऊ शकते. त्याशिवाय एक व्यक्ती आरडी स्कीम चे अकाउंट किती पण ओपन करू शकतो.

रोज 100 रुपये जमा करून 5 लाख रुपये कसे मिळवायचे?

उदाहरणांमध्ये जर एका व्यक्तीने रोज 100 रुपयांची बचत केली. तर या हिशोबाने तो एकटा एका महिन्यात 3 हजार रुपये पर्यंत पैशाची बचत करतो. नंतर हेच पैसे जर पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये जमा करतो तर त्याला खूप मोठा रिटर्न मिळतो. जर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत रक्कम प्राप्त करायची असेल.

तर तुम्हाला सर्वप्रथम 3 हजार रुपये लगातार 10 वर्षापर्यंत जमा करावे लागेल. या 10 वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक रक्कम 3 लाख 60 हजार रुपये होईल. त्यानंतर 6.7 टक्क्याने तुम्हाला या दहा वर्षात टोटल 1 लाख 52 हजार 565 रुपये व्याज मिळेल आणि संपूर्ण रक्कम 5 लाख 12 हजार 565 रुपये मिळेल. अशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता.

आजपासून बँक खात्यामध्ये फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार आहे, जाणून घ्या नवीन नियम

Leave a Comment