WhatsApp

PM Kisan Apatra Suchi: पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, इथे पहा यादी

PM Kisan Apatra Suchi: भारत सरकारच्या अंतर्गत जनतेसाठी खूप सार्‍या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे आणि त्या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना साल 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना 4 महिन्यांनी मिळून वितरित केली जाते. तथापि प्रत्येक टप्प्यामध्ये 2 हजार रुपयांचा वाटप केला जातो. जर या योजनेचा उद्देश पाहिला तर हाच आहे की शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये स्थिरता आणणे. परंतु काही अटी आणि नियमामुळे काही शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. या योजनेतून तुम्ही अपात्र झालात का यासाठी तुम्हाला यादी पाहणे खूप महत्त्वाचे आहे.

काय आहे पीएम किसान योजना?

प्रधानमंत्री किसान योजना ही खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 13 करोड पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घेतलेला आहे. याचबरोबर पाहिले तर आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे 19 हप्ते वितरित केले आहे. या हिशोबाने जर पाहिले तर केंद्र सरकारने 38 हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे.

आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मित्र 20व्या हप्त्याची खूप आतुरतेने वाट बघत आहे. कारण या छोट्याशा मदतीमुळे शेतकरी पेरणीसाठी कीटकनाशके, बियाणे, खते, पाणी, मजुरी आणि इतर आवश्यक गरजांची पूर्तता करू शकतो. खरं म्हटलं तर पीएम किसान योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत मिळते. जेणेकरून त्यांचा भार खूप कमी होतो.

मालकी हक्क

जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे की अर्जदारांच्या नावावर शेती असली पाहिजे. म्हणजे केंद्र सरकारने ही योजना सुरूकरण्या अगोदरच मालकी हक्काला प्राधान्य दिले जाईल याची घोषणा केली होती. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या नावावर जमीन नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

इतकेच नव्हे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लोकं दुसऱ्याच्या शेतातील भाड्याने काम करतात. त्यांना पीएम किसान योजनेचा फायदा घेता येत नाही. याव्यतिरिक्त जे लोकं कंत्राटी पद्धतीने शेती करत आहेत यांना सुद्धा देखील लाभ मिळत नाही. याचबरोबर सहकारी पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. थोडक्यात सांगायचे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे आणि पडताळणी

जे शेतकरी आतापर्यंत या योजनेपासून वंचित राहिले आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर त्यांच्याकडे अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे 7/12 उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या कागदपत्रामुळे हे कळून येते की तुमच्याकडे किती जमीन आहे.

याशिवाय मालकी पत्रिका, मुटेशन पेपर्स, जमीन खरेदीचे कागदपत्र सारखे अधिकृत कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कारण अर्ज करता वेळेस सरकारी कर्मचारी या कागदपत्रांची पडताळणी करत असतात. जर अशा वेळेस सरकारी कर्मचाऱ्यांना तुमच्या कागदपत्रांमध्ये काही चुकीची किंवा घोळ दिसून येत असेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येतो.

पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची‌ यादी कशी पहावी?

पीएम किसान योजनेची अपात्र यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला होम पेजवर डॅशबोर्ड चे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि गाव निवडायचे आहे आणि शो बटणावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या स्क्रीनवर अपात्र शेतकऱ्यांची यादी ओपन होईल. ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

1 thought on “PM Kisan Apatra Suchi: पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, इथे पहा यादी”

Leave a Comment