Jio New Recharge Plan: भारतामध्ये अनेक प्रकारच्या टेलिकॉम कंपनी आहेत. परंतु सध्या जी कंपनी आघाडीवर आहे ती म्हणजे रिलायन्स कंपनी आहे. जिओ हे ग्राहकांना बाकीच्या कंपन्या पेक्षा स्वस्त रिचार्ज प्रदान करते आणि याच बरोबर 5g नेटवर्क सुद्धा मोफत देते. यामुळे भारतामधील सर्वात जास्त जिओ कंपनीचे यूजर्स आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी टेलिकॉम या कंपनीने ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज प्लान्स जारी केले आहे.
आणि हे प्लॅन्स लांब अवधीचे आहे. म्हणजेच या प्लॅन्समध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. बऱ्याच वेळी असे होते की ग्राहकांना दर महिन्याला रिचार्ज करणे खूप कठीण जाते आणि रिचार्ज करता करता ग्राहक खूप त्रस्त होतात. यामुळे कंपनीने थेट 84 दिवसांची वैधता असलेला प्लान ग्राहकांसमोर सादर केलेला आहे.
ही आहे 84 दिवसांच्या प्लॅनची वैशिष्ट्ये
जिओच्या या 84 दिवसांच्या प्लॅनची वैशिष्ट्ये ही आहे की यामध्ये ग्राहकांना अनेक दिवसांची वैधता मिळते. यामुळे ग्राहकांना दर महिन्याला रिचार्ज टाकण्याची गरज पडणार नाही. जर एका हिशोबाने पाहिलं तर तुम्हाला 3 महिन्याची सरळ सरळ वैधता मिळते. हे प्लान्स त्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे. ज्यांना दर महिन्याला रिचार्ज करायचा कंटाळा येतो.
जर तुम्ही हे प्लान घेतले तर तुम्हाला विशेष सुविधा मिळतात. जसे की सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. याचबरोबर तुम्हाला निश्चित हाय स्पीड डेटा मिळतो. तुम्ही दररोज 100 संदेश पाठवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही जिओच्या अनेक प्रकारच्या डिजिटल सेवांचे सबस्क्रीप्शन मोफत घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचे तुम्हाला 5g नेटवर्कची सुविधा मिळते.
395 रुपयाचा प्लॅन
जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे आणि या फुलांची वेधता 84 दिवसांची आहे. या प्लान मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, 100 संदेश आणि 6 जीबी डेटा मिळतो. लक्ष द्या 6 जीबी डाटा तुम्हाला रोज मिळत नाही तुम्हाला एकदाच मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी योग्य आहे. ज्यांना जास्त करून मोबाईल डेटा ची गरज पडत नाही. ते फक्त कॉलिंग साठीच फोन वापरतात.
मध्यम श्रेणीतील जिओ रिचार्ज चे प्लान
जर पाहिलं तर जिओ कंपनीने ग्राहकांसाठी मध्यम श्रेणीतील प्लान सुद्धा सादर केलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 ते 2 जीबी डाटा मिळतो. इतकच नाही तर तुम्हाला याबरोबर जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड सारख्या सेवांचे मोफत मध्ये सबस्क्रिप्शन मिळते.
प्रीमियम श्रेणीतील प्लान
जे लोकं दररोज सर्वात जास्त डेटा वापरतात. त्यांच्यासाठी जिओ कंपनीने दररोज 3 जीबी डेटा असणारा प्लान सादर केलेला आहे यामध्ये त्यांना नेटफ्लिक्स सोनी लिव आणि झी5 सारख्या प्रीमियम ओटीटीचे मोफत सबस्क्रीप्शन मिळते.
डिजिटल सेवांचे झाले एकत्रीकरण
जर तुम्ही वरील माहिती वाचली असेल तर तुम्हाला कळून आले असेलच की या प्लानमध्ये फक्त कॉलिंग आणि डेटाच नाहीतर अनेक ओटीटीचे सबस्क्रीप्शन मोफत मिळते. यामुळे ग्राहकांना या ॲप्सची सबस्क्रीप्शन्स घेण्याची गरज नसते. ज्यामुळे ग्राहकांचा खूप कमी खर्च होतो. आपण याला डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोन भाग सुद्धा म्हणू शकतो.
ग्राहकांची प्रतिक्रिया आणि स्थिती
बाजारातील जिओच्या या 84 दिवसांच्या प्लॅन्सला खूप चांगला प्रतिसाद मिळण्याची बातमी समोर आलेली आहे. विशेषता म्हणजे गावाकडील जास्त लोक या प्लॅन्सला प्राथमिकता देत आहे.
कारण ग्रामीण भागातल्या लोकांकडे दर महिन्याला रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध नसते. याचबरोबर जिओ कंपनीने या प्लॅन्समुळे खूप सारे ग्राहक वाढले आहेत. कंपनीच्या अनुसार थोडक्यात सांगायचे तर या 84 दिवसीय प्लान्स मुळे ग्राहकांमध्ये समाधान वाढलेले आहे.