Free Tokan Yantra: महाराष्ट्रातील विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय नमो शेतकरी योजना आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून या कल्याणकारी योजनाचा लाभ दिला जातो. तो म्हणजे महाडीबीटी पोर्टलच्या मार्फत दिला जातो.
आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना फुकट टोकन यंत्र देणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. टोकन यंत्राचा फायदा हाच आहे की 1 माणूस 1 एकर शेत 2 तासात सहज पेरू शकतो. अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर तुम्हाला टोकन यंत्रावर सबसिडी सुद्धा मिळू शकते.
टोकन यंत्रावर किती अनुदान मिळते?
सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोकन यंत्रासाठी अनुदान दिले जाते. या यंत्राच्या मदतीने शेतकरी हरभरा, मका, सोयाबीन सारख्या अनेक पिकांची लागवड सहजपणे करू शकतो. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचं काम खूप सोपे होऊन जाते. म्हणून ज्या कोणालाही हे टोकन यंत्र मशीन पाहिजे असेल.
तर त्यांनी डीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे त्यांना जास्तीत जास्त 10 हजार रुपये अनुदान दिले जाते व याचबरोबर ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 8 हजार रुपये अनुदान मिळते.
महाडीबीटी पोर्टलवर अशाप्रकारे करा लॉगिन
ज्या शेतकऱ्यांना टोकन यंत्र पाहिजे त्यांना सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉगिन करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जर अर्ज करत असाल तर तुम्हाला तीन डॉट्सवर क्लिक करायचे आहे आणि डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे.
यामुळे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर अर्जदार येथे लॉगिन करा या सेक्शन मध्ये जाऊन वैयक्तिक शेतकरीचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शेतकरी कार्डचा नंबर टाकायचा आहे.
ओटीपी सत्यापित करा
जेव्हा तुम्ही फार्मर आयडीचा नंबर टाकसाल तर तुम्हाला ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे. ओटीपी तुमच्या रजिस्टर नंबर वर प्राप्त होईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर महाडीबीटीची वेबसाईट ओपन होईल. पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला बाजूला घटकासाठी अर्ज करा या विकल्पावर क्लिक करायचे आहे. पुन्हा तुमच्यासमोर नवीन पान उघडेल ज्यामध्ये कृषी यंत्रिकरण या घटकासमोर बाबी निवडा या विकल्पावर क्लिक करायचे आहे.
आता तुम्ही यंत्रसामग्री अवजारे या विभागात जाऊन निवड करा या विकल्पावर क्लिक करा. त्यानंतर खालीच स्क्रॉल करा मग तुम्हाला टोकन यंत्राचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे. आता तुम्हाला मशीन चा प्रकार निवडायचा आहे आणि हो सर्वात महत्वाचे तुम्हाला डिक्लेरेशन वाचायची आहे. डिक्लेरेशन वाचून झाल्यानंतर तुम्हाला त्या बॉक्स वरती करायची आहे आणि जतन करा या बटणावर क्लिक करायचं आहे.
असा करा अर्ज सादर
आता शेतकऱ्यांना मुख्यपृष्ठावर परत यायचे आहे आणि अर्ज सादर करायचा आहे. लक्ष द्या तुम्ही जेवढी माहिती भरली ती तुम्हाला परत एकदा तपासायची आहे. नंतर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे एवढी पेमेंट करायची आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. या प्रकारे तुम्ही टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
सरकारकडून बांधकाम मजुरांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे मिळतील
1 thought on “Free Tokan Yantra: फक्त या शेतकऱ्यांना मिळणार फुकट टोकन यंत्र, लगेच करा असा अर्ज”