WhatsApp

Free Silai Machine Yojana: या महिलांना सरकार देणार मोफत शिलाई मशीन, अर्ज प्रक्रिया येथे पहा

Free Silai Machine Yojana: केंद्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी एक अशा योजनेची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. तसे जर पाहिले तर या अगोदर सुद्धा सरकारने खूप महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे फ्री शिलाई मशीन योजना आहे. या स्कीम मध्ये फक्त महिलांनाच लाभ घेता येणार आहे.

लक्ष द्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून थेट शिलाई मशीन भेटणार नाही तर थेट 15 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर ज्या महिलांना शिलाई मशीन चालविता येत नाही. त्या महिलांना सरकारच्या अंतर्गत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचे मानधन सुद्धा दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा.

फ्री सिलाई मशीन योजनेचे फायदे

सर्वप्रथम महिला अर्जदारांना शिलाई मशीन विकत घेण्याकरिता 15 हजार रुपये दिले जाणार आहे. परंतु अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला सरकारच्या पात्रतेमध्ये बसतात. या 15 हजार रुपयांच्या माध्यमातून महिला शिलाई मशीन, सुया, कात्री, कापसाचे धागे आणि इतर साहित्य विकत घेऊ शकते.

याच बरोबर सरकारकडून 8 ते 10 दिवसांचे संपूर्ण प्रशिक्षण महिलांना दिले जाते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र सुद्धा दिलं जाते. ट्रेनिंग सुरू असताना रोज 500 रुपयाचं मानधन सुद्धा दिलं जाते. हे मानधन यासाठी दिले जाते कारण ट्रेनिंग घेणाऱ्या स्त्रियांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये.

लाभ घेण्यासाठी पाहिजे ही पात्रता

सर्वप्रथम या योजनेचा लाभ फक्त 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेली महिलाच घेऊ शकते. याबरोबर अर्जदार भारत देशाचा नागरिक असावा आणि अर्जदारांकडे महत्त्वाचे कागदपत्रे असावेत. महिलांना शिवणकामाचा अगोदरच अनुभव किंवा या क्षेत्रातील पारंपारिक कामगिरी असणे खूप महत्त्वाचे आहे.

काही ठिकाणी शिवणकामाचा व्यवसाय कौटुंबिक सुद्धा असू शकतो. अर्ज करणारी महिलांची आर्थिक स्थिती सामान्य किंवा त्यापेक्षा दुर्बल असणे खूप महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त जर महिलांच्या घरांमध्ये सरकारी नोकरी करणारा कोणता व्यक्ती असेल तर अशा परिस्थितीत कोणालाही लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल. तर त्यांच्याजवळ खालील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये महिलांजवळ आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, जाती प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणे खूप महत्त्वाचे आहे.

अर्ज कसा करावा?

शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि हो अर्जदार, महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा ही माहिती पाहू शकतात. त्यानंतर तुम्हाला होमपेजवर नोंदणी या विकल्पावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर भरायचा आहे. मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, तो योग्य जागेवर भरायचा आहे.

यानंतर तुमच्यासमोर शिलाई मशीनचा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. हे सर्व झाल्यानंतर वरील दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि खालील दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. अशाप्रकारे तुम्ही फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरू शकता.

Leave a Comment