Free Ration: भारतामधील करोडो गरीब कुटुंबांना मोफत राशन देण्यात येते आणि ही राशन योजना त्यांच्यासाठी एक प्रकारे वरदान ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार गरजू कुटुंबीयांना मोफत मध्ये अन्नधान्य वितरित करते. हे सर्व मोफत अन्नधान्य गरीब कल्याण योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा च्या मार्फत पुरवले जाते.
जर तुम्हाला या योजनेचा अजून पण लाभ मिळत नसेल. तर तुम्ही मोफत राशनासाठी अर्ज करा आणि त्यासोबत काही वस्तू मोफत मिळवा. तसे तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमातून या योजनेबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सांगितले आहे.
मोफत राशनची सुरुवात कशी झाली?
अधिकृत माहितीनुसार मोफत राशन योजना ही विशेषता गरीब कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे. या स्कीम मध्ये कुटुंबांना दर महिन्याला निश्चित तांदूळ, गहू, डाळी आणि इतर वस्तू देण्यात येते. मोफत राशनची सुरुवात कशी झाली याबद्दल पाहिले तर कोविड-19 च्या काळामध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
आणि नंतर जास्तीत जास्त कुटुंबांना याचा फायदा मिळत होता. या योजनेचा उद्देश हाच आहे की भारतामधील कोणत्याच कुटुंबीयांना भुकेचा त्रास होऊ नये. यामुळेच केंद्रीय सरकारने मोफत राशनची सुरुवात केली. परंतु प्रत्येक राज्यानुसार या योजनेची अंमलबजावणी वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे.
पात्रता काय पाहिजे?
जर तुम्हाला मोफत राशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये सर्वप्रथम अर्जदार भारत देशाचा नागरिक असावा आणि त्याच्याकडे आधार कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त नसलेले पाहिजे.
तथापि ह्या अटी राज्याच्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. अपंग व्यक्ती, विधवा महिला, गरीब कुटुंब आणि वृद्ध नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे वैध राशन कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा राशन कार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे. कारण राशन कार्ड शिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज करताना तुमच्याजवळ आवश्यक कागदपत्रे होणे खूप आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे बीपीएल किंवा एपीएल राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे देखील पाहिजे. अर्जदारांकडे रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास दाखला पाहिजे. ओटीपी साठी चालू मोबाईल नंबर आणि नवीन पासपोर्ट साईज फोटो पाहिजे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
मोफत राशन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या राजाच्या अन्न आणि नागरी पुरवठाच्या nfsa.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर Apply For Free Ration किंवा नवीन अर्ज या लिंक वर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर वरील दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे. नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरायचा आणि खालील दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे.
30 लाख छात्रों को मिलेगा फ्री लैपटॉप, देखें कौन कर सकता है आवेदन