WhatsApp

Ladki Bahin Yojana: सरकार महिलांना देणार 40 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जनतेसाठी विभिन्न प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे आणि त्यामधील सर्वात महत्त्वकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व गरीब आणि सर्वसाधारण स्त्रियांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

पण आता याच आर्थिक मदती बरोबर आता लाभार्थी महिलांना 40 हजार रुपये पर्यंतचे कर्ज सुद्धा मिळणार आहे. परंतु हे कर्ज त्याच महिलांना वितरित केल्या जाणार आहे, ज्या महिला वर्तमानामध्ये लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे. सरकार हे कर्ज महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देणार आहे. जर तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये

सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेची सर्वात चांगली गोष्ट हीच आहे की तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी काहीच गहाण ठेवण्याची गरज नाही. याचबरोबर जेव्हा तुम्ही कर्ज घेसाल तर तेव्हा कर्जाची हप्ते थेट महिन्याच्या मिळणाऱ्या हप्त्यातून वजा केले जाणार आहे. यामुळे हा फायदा होतो की महिलांना जास्त ताण घेण्याची गरज भासणार नाही.

खरं म्हटलं तर ही योजना महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करून देऊ शकतात. त्याशिवाय तुम्हाला जास्त महत्त्वाची कागदपत्रे देण्याची गरज सुद्धा नाही. तुम्ही एकदम साध्या सोप्या प्रक्रियेमध्ये कर्ज मिळवू शकतात. महिला मिळालेल्या कर्जाच्या मार्फत लघुउद्योग, गृह उद्योग नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्रता

महिलांना जर या योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना सरकारच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे खूप आवश्यक आहे व याचसोबत महिलाची कमीत कमी वय 21 वर्ष तर जास्तीत जास्त 60 वर्षाच्या दरम्यान असली पाहिजे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की महिलांनी या योजनेचे कमीत कमी 10 हप्त्यांचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या घरात कोणताच व्यक्ती सरकारी नोकरी करणारा नसावा. याव्यतिरिक्त अर्जदारांकडे स्वतःच्या नावावर चार चाकी गाडी नसावी.

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

महिलांना कर्ज काढण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे पाहिजे. त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त महिलांचे बँक खातं असणे गरजेचे आहे. लक्ष द्या महिलांना बँक पासबुक मध्ये 6 महिन्यांची बँक स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. स्वयंघोषणापत्र व महिलांचा पासपोर्ट साईज फोटो लागतो.

कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज

ज्या महिलांना या योजनेच्या मार्फत 40 हजार रुपयाचे कर्ज घ्यायचे आहे. त्यांनी सर्वप्रथम जवळच्या सरकारी बँक, सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन संपर्क करायचा आहे. तिथे जाऊन तुम्हाला लाडकी बहीण कर्ज योजनेचा अर्ज प्राप्त करायचा आहे. महिलांनी लक्ष द्या फॉर्म भरता वेळेस तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.

आणि त्या फॉर्म सोबत वरील सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायाचा आराखडा आणि कर्जाचा वापर कसा करणार आहे याची माहिती द्यायची आहे. यानंतर बँकेचे अधिकारी तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे तपासतील. जर सर्व माहिती बरोबर असेल तर 7 ते 15 दिवसांच्या आत तुम्हाला कर्ज मिळून जाते.

1 thought on “Ladki Bahin Yojana: सरकार महिलांना देणार 40 हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment