WhatsApp

PM Kisan 20th Installment Date: या दिवशी येणार पीएम किसान 20व्या हप्त्यांचे पैसे, तारीख झाली जाहीर, संपूर्ण माहिती येथे वाचा

PM Kisan 20th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ वर्तमान काळात शेतकऱ्यांना देखील मिळत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जवळपास 19 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे.

मात्र आता शेतकरी खरीप हंगाम पेरणीसाठी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे.

पीएम किसान योजनेची स्थिती

अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याची संपूर्ण तयारी सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांना डीबीटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्या जाणार आहे. इतकेच नव्हे तर केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून प्रक्रिया सुरू केली गेली आहे.

परंतु अशावेळी बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात एक प्रश्न उत्पन्न होतो की हा येणार हप्ता माझ्या बँक खात्यामध्ये पडणार आहे का नाही. तर बघा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचे ऑनलाइन स्टेटस चेक करू शकता.

असे करा पीएम किसान योजनेचे ऑनलाईन स्टेटस चेक

ऑनलाइन स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://pfms.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. नंतर तुम्ही मुख्यपृष्ठावर DBT Status Tracker हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला कॅटेगिरी मध्ये PM KISAN चा पर्याय निवडायचा आहे.

पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, इथे पहा यादी

चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि लक्ष द्या हा नंबर MH ने सुरू होतो. त्यानंतर खाली दिलेला कैप्चा कोड टाकायचा आणि सर्च बटणावर क्लिक करायचं. यानंतर तुम्हाला सर्व तपशील सोबत दिसेल. इतकंच नव्हे तर अगोदर जितके हप्ते भेटले त्याचे सुद्धा विवरण तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार हप्ता

ज्या शेतकऱ्यांचे आरएफटी मंजूर झालेले आहे अशाच शेतकऱ्यांना येणारा 20वा हप्ता मिळणार आहे. यासोबतच एफटीओ तयार झालेले शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची योजनेत नोंदणी पूर्णपणे आहे.

फक्त या शेतकऱ्यांना मिळणार फुकट टोकन यंत्र, लगेच करा असा अर्ज

त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित आहे आणि त्यांनी केवायसी केलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे.

या दिवशी येणार 20वा हप्ता

भारतातील जवळपास सर्वच शेतकरी पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याची खूप वाट पाहत आहे. अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर तुम्हाला पीएम किसान चा हप्ता एफटीओ तयार झाल्यानंतर लगेच मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा सरकार एफटीओ तयार करते.

त्यानंतरच वितरणाची तारीख जाहीर करण्यात येते. त्यानंतर त्या दिवशीच नाहीतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा ट्रान्सफर केले जातात. म्हणजेच जेव्हा एफटीओ तयार होतो त्याच्या 2 ते 3 दिवसांतच शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होते.

फक्त 585 रुपयात अख्खा महाराष्ट्र फिरा, ST महामंडळाची नवीन स्कीम सुरू

Leave a Comment