WhatsApp

Free Gas Cylinder: सरकार फक्त या महिलांनाच देत आहे मोफत 3 गॅस सिलेंडर, त्वरित अर्ज करा

Free Gas Cylinder: सर्व गरीब महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ही आनंदाची बातमी गरीब रेषेखालील कुटुंबांमधील सर्व महिलांसाठी आहे. सरकारने काही वर्षांपूर्वी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक योजना काढली आहे. ज्याचे नाव प्रधानमंत्री उज्वला योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. तुम्हाला सांगण्यात येते की या योजनेच्या माध्यमातून मोफतमध्ये गॅस कनेक्शन मिळते.

जर या योजनेचे उद्देश पाहिला तर हाच आहे की ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्यांना आरोग्याचा त्रास व त्यांच्या आरोग्याची हानी न व्हावी म्हणून या स्कीमची सुरुवात केली आहे आणि अर्ज केल्यानंतर पहिल्याच वेळेस 3 गॅस सिलेंडर मोफत (Free Gas Cylinder) मिळणार आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यांच्याकडे आताही सुवर्णसंधी आहे. म्हणून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन लगेच अर्ज करा.

काय आहे या योजनेचा उद्देश?

जर या योजनेचा उद्देश आपण पाहिला तर गावातील खूप सारे कुटुंबं आज सुद्धा चुलीचा वापर करतात. याव्यतिरिक्त लाकूड आणि कोळसा इंधनावर आज पण अवलंबून असतात. जेव्हा महिला स्वयंपाक करता वेळेस चूल पेटवतात त्यानंतर त्या इंधनामुळे होणारा धूर महिलांच्या आरोग्यावर हानिकारक होतो. इतकेच नव्हे तर या धुरामुळे महिलांच्या फुफ्फुसाचे आजार सुद्धा होऊ शकतात.

याचबरोबर डोळ्यात धुर गेल्यामुळे डोळ्यासंबंधीत समस्या उत्पन्न होतात. थोडक्यात सांगायचे तर या धुरामुळे महिलांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने विशेषता महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ची सुरुवात केली आहे. महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे. तर हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लाभ घेण्यासाठी पात्रता

ज्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत मध्ये तीन गॅस सिलेंडर घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने काही अटी ठेवलेल्या आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम महिला ही भारत देशाची नागरिक असावी.

याव्यतिरिक्त महिलेचे वय कमीत कमी 18 वर्षापेक्षा जास्त असावे. कुटुंब गरिबी रेषेखालील महिला असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अगोदर महिलांकडे कोणत्याही प्रकारचे गॅस सिलेंडर कनेक्शन नसावे.

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला सुद्धा मोफतमध्ये तीन सिलेंडर पाहिजे असेल. तर तुमच्याकडे सरकारच्या अनुसार काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड, राशन कार्ड, बँक खात्याचे पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज चा फोटो पाहिजे.

अर्ज कसा करावा?

मोफत मध्ये गॅस कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या pmujjwalayojana.com या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. नंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन या योजनेस संबंधित फॉर्म डाउनलोड करायचा आहे.

तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला फॉर्ममध्ये जेवढी माहिती विचारली, तेवढी माहिती अचूकपणे भरायची आहे. आता वरील दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत जोडायचे आहे आणि शेवटी अर्ज भरलेला फॉर्म जवळच्या गॅस एजन्सी ऑफिस वर जाऊन जमा करायचे आहे.

सिर्फ 15000 रुपए से शुरू करें ये कभी भी बंद ना पड़ने वाले बिजनेस, महीने की होगी बंपर कमाई

Leave a Comment