WhatsApp

Today Tur Rate: आज तुरीला किती बाजारभाव मिळाला, येथे पहा तुरीचे ताजे भाव

Today Tur Rate: सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर तुरीच्या भावांमध्ये तुरीचे दर किती असतील हे जाणून घेणं खूप महत्त्वाचा आहे. कारण या तुरीच्या दरावरच शेतकऱ्यांची आर्थिक गणितं ठरत असतात. म्हणून आज आपण त्या लेखाच्या माध्यमातून तुरीच्या भावात किती वाढ झाली. ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर आज तूर भावात चढ उतार दिसून आलेले आहे.

म्हणजेच काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर घसरले आणि काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना तुरीच्या भावात चांगले दर मिळाले आहेत. तुरीची भाव कधी घसरतात तर कधी वाढतात याचं कारण हेच आहे की तुरीची मागणी सध्या बाजारात खूप आहे. यासाठी तुम्हाला खालील प्रत्येक बाजार समित्यांमध्ये किती भाव मिळाला आहे याची माहिती सांगितली आहे.

अकोला बाजार समिती

सर्वप्रथम अकोल्याच्या बाजार समितीमध्ये लाल तुरीची संपूर्ण  893 क्विंटल आवक झाली आहे. या बाजारामध्ये लाल तुरीचे भाव कमीत कमी 6 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 6 हजार 980 रुपये पर्यंत होते. जर सरासरी ची गोष्ट केली तर तुरीला 6700 रुपयांचा भाव मिळाला आहे. जास्त मागणीमुळे तुरीच्या दरात स्थिरता दिसून आलेली आहे.

मालेगाव बाजार समिती

सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर मालेगाव बाजार समितीमध्ये तुरीची फक्त 20 क्विंटल आवक झाली आहे. येथे शेतकऱ्यांना 2 हजार 100 रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जर सरासरीची गोष्ट केली तर तुरीला 5 हजार 270 रुपये दर मिळाला आहे.

अमरावती बाजार समिती

अमरावती बाजार समितीमध्ये खूप जास्त तुरीची आवक झालेली आहे. या समितीत जवळपास 2827 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. येथे लाल तुरीला कमीत कमी 6450 आणि जास्तीत जास्त 6671 रुपयांचा भाव मिळाला आहे. याचबरोबर येथे तुरीचा सरासरी दर 6 हजार 560 रुपये नोंदविला गेलेला आहे.

नागपूर बाजार समिती

नागपूर बाजार समितीमध्ये लाल तुरीची जवळपास 709 क्विंटल आवक नोंदविली गेलेली आहे आणि येथे तुरीला कमीत कमी भाव 6 हजार 500 रुपये मिळाला आहे आणि जास्तीत जास्त भाव 6 हजार 852 रुपये मिळाला आहे. तथापि, या बाजारात तुरीला सरासरी दर 6 हजार 764 रुपये मिळाला आहे. जो अत्यंत चांगला आहे.

बीड बाजार समिती

बीड बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची जवळपास 39 क्विंटल आवक झाली आहे आणि या तुरीला कमीत कमी 6 हजार 200 रुपये भाव मिळाला आहे आणि जास्तीत जास्त 6 हजार 741 रुपये भाव मिळाला असून सरासरी भाव 6 हजार 494 रुपये मिळाला आहे.

वैजापूर – शिऊर बाजार समिती

वैजापूर आणि शिऊर या बाजार समितीमध्ये लोकल तुरीची फक्त 4 क्विंटलच आवक झाली आहे. येथे लोकल तुरीला 3 हजार 500 रुपये तर जास्तीत जास्त 6 हजार 300 रुपये भाव मिळाला असून सरासरी भाव 3 हजार 624 रुपये नोंदविला गेलेला आहे.

करमाळा बाजार समिती

करमाळा बाजार समितीमध्ये केवळ बारा क्विंटल पांढरी तुरीची आवक झाली आहे आणि येथे या तुरीला फक्त 6 हजार 600 रुपये इतका भाव मिळाला आहे.

तुळजापूर बाजार समिती

तुळजापूर मध्ये जवळपास 72 क्विंटल तुरीची आवक झाली आहे आणि या बाजारामध्ये तुरीला कमीत कमी 6 हजार रुपयांचा दर मिळाला आहे आणि जास्तीत जास्त 6 हजार 500 रुपयांचा दर मिळाला आहे. तथापि, तुरीला या समितीमध्ये सरासरी दर 6 हजार 400 रुपये मिळाला आहे.

आजचा सोयाबीन रेट बघितलात का, आजचा दर बघून शेतकरी ही थक्क, जाणून घ्या आजचे रेट

Leave a Comment